यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!
आजच्या डीजीटलायझेशनच्या आणि स्पर्धेच्या युगात मार्गक्रमण करताना बँकेच्या भविष्याविषयीचा माझा दृष्टीकोन आपल्या समोर मांडताना मला विशेष आनंद होत आहे. आज आपल्या सर्व खातेदारांची उच्च दर्जाची गतिमान आणि अचूक सेवेची अपेक्षा आहे, त्यासाठी आवश्यक डीजीटल सेवा उपलब्ध करून देऊन तसेच आमच्या कार्य क्षमतेत वाढ करून आपल्याला अखंड, तत्पर अचूक आणि गतिमान सेवा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
आजच्या डीजीटलायझेशनच्या युगात बँकांमधील असलेल्या तीव्र स्पर्धेला सामोरे जाताना डीजीटलायझेशनसाठी येणारा मोठा खर्च विचारात घेतला तर आपल्या सारख्या छोट्या बँकांसमोर आज मोठे आव्हान उभे आहे. परंतु असे असतानाही आपली बँक आपल्या सन्माननीय ग्राहकांना उच्च दर्जाची आणि अचूक सेवा देणेसाठी डीजीटलायझेशन करीता मोठी आर्थिक गुंतवणूक करून अन्य बँकांच्या बरोबरीने सेवा देण्याकरिता प्रयत्नशील आहे.
आपण सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार या सर्वांनी आतापर्यंत ज्या खंबीरपणे बँकेच्या पाठीशी उभे राहुन साथ दिलीत त्याबद्दल मी आपणा सर्वांप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. येणाऱ्या काळात नवीन संधी आणि सर्वांची सर्वांगीण वाढ होणेसाठी आपण सर्वजण एकत्रित काम करूया.

धन्यवाद.
आपला
योगेश मधुकर बाबर.